नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Saturday, July 1, 2023

बेलदारवाडी येथे बाल दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल , ज्ञानोबा - तुकाराम , जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात आज जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे वेश परिधान केले होते तसेच सर्व मुलींनी साड्या परिधान केल्या होत्या.विठ्ठलाच्या रुपात इयत्ता ४ थी मधील जयराज तर रुक्मिणीच्या रुपात ३ री मधील अनुष्का आलेले होते.शाळेतील काही मुलींनी तुळशी वृंदावन आपल्या डोक्यावर घेतलेले होते.यामध्ये अंगणवाडी मधील सर्व मुले समाविष्ट झाली होती.सदरचा दिंडी सोहळा जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी पासून हनुमान मंदिर पर्यंत पायी विठ्ठलाच्या जयघोषात गेला तिथे हनुमान मंदिरास सर्व वारकऱ्यांनी प्रदक्षिणा घातली.त्यानंतर सर्वांनी हनुमानाचे दर्शन घेतले.आणि मंदिरातच रिंगण सोहळा साजरा करण्यात आला.पोलीस पाटील श्री.योगेश मस्कर यांनी छोट्या वारकऱ्यांना टाळ उपलब्ध करून दिला होता.सदर दिंडी सोहळा मंदिरात असताना ग्रामपंचायत सदस्या राजश्री आनंदा शेवाळे व पालक जयश्री चंद्रकांत शेवाळे यांनी फरसाणा व चहा वाटप केले. बाबासो मस्कर , सविता दिनकर जाधव, शारदा जाधव यांनी दिंडीत सहभागी असलेल्या सर्वांना चॉकलेट वाटप केले.सदर दिंडी सोहळ्यास सरपंच योगिता बिळासकर यांनी भेट दिली.दिंडी गावातून जात असताना गावातील नागरिक ही सदर दिंडीत सहभागी झाले होते.हनुमान मंदिर पासून शाळेत दिंडी आल्यानंतर माजी सरपंच धर्मेंद्र शेवाळे , बाबासो शेवाळे यांच्या वतीने सर्वांना चॉकलेट वाटप केले.अर्जुन मस्कर सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट पुड्याचे वाटप केले.यावेळी बेलदारवाडी गावचे पोलीस पाटील योगेश मस्कर, ग्रामपंचायत सदस्या राजश्री शेवाळे , चंद्रकांत शेवाळे , रमेश पाटील,  माजी सरपंच धमेंद्र शेवाळे , अर्जुन मस्कर  , बाबासो शेवाळे , बाबासो मस्कर, अंगणवाडी सेविका विजया पाटील , मदतनीस संगीता शेवाळे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.सदर दिंडी सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापक तानाजी कदम व राजाराम काटवटे सर यांनी केले.श्री.तानाजी कदम सर यांनी शेवटी दिंडी सोहळ्यास दिलेल्या प्रतिसादाबद्दल तसेच विद्यार्थ्यांना दिलेल्या खाऊ वाटप याबद्दल सर्वांचे आभार मानले व दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.






Thursday, June 29, 2023

शाळा पूर्व तयारी मेळावा बातमी



👆👆👆👆👆👆👆👆👆
शाळा पूर्व तयारी मेळाव्याची बातमी मंगळवार दिनांक - 27/06/2023 रोजी पुढारी पेपरच्या My सांगली पुरवणीच्या पान नंबर ४ वर आलेली आहे.

Saturday, June 24, 2023

बेलदारवाडी येथे शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा


आज जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्र.२ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी इयत्ता पहिलीतील नवीन दाखल विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत केले. सर्व ६ विद्यार्थ्याना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांच्या ६ दालनामधील क्षमतांची तपासणी करण्यात आली.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अंकुश पाटील , शिक्षणप्रेमी व पालक श्री.सुधीर बिळासकर ,श्री.विक्रमसिंह बिळासकर , श्री.चंद्रकांत शेवाळे , श्री.बाळासो बिळासकर , श्री.शंकर जाधव , अंगणवाडी सेविका सौ.संगीता शेवाळे , सौ.रेखा मस्कर तसेच १ लीच्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर यांनी सूत्रसंचलन केले तर उपशिक्षक श्री.काटवटे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.सदर कार्यक्रमाची क्षणचित्रे खालीलप्रमाणे



























Wednesday, June 21, 2023

बेलदारवाडी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा



आज बुधवार दिनांक २१.०६.२०२३ रोजी जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तानाजी कदम सर व उपशिक्षक श्री काटवटे सर यांनी विद्यार्थ्यांकडून विविध शारीरिक पूरक हालचाली व विविध योगासने करून घेतली. तसेच टीव्हीवर योगासने दाखवण्यात आली व त्यानुसार विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेण्यात आली.सदर योग कार्यक्रमात अंगणवाडी मदतनीस संगीता शेवाळे , आशा स्वयंसेविका सौ.सुजाता शेवाळे यांनीही सहभाग घेतला. सदर योग दिनाची क्षणचित्रे खालीलप्रमाणे


























Thursday, June 15, 2023

बेलदारवाडी शाळेत नवागतांचे स्वागत

 आज गुरुवार दिनांक १५.०६.२०२३ रोजी जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे शैक्षणिक वर्षातील पहिला दिवस मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी शाळेत नवीन दाखलपात्र ६ विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व वही देऊन स्वागत करण्यात आले.तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. शाळेतील सर्व मुलींना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.आणि सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बेलदारवाडी गावच्या सरपंच माननीय योगिता सुधीर बिळासकर व उपसरपंच लक्ष्मी बाबासो शेवाळे , ग्रामपंचायत सदस्या राजश्री आनंदा शेवाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश पाटील , उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे  , BRC शिराळाचे साधनव्यक्ती , तज्ञ मार्गदर्शक प्रदीप कदम सर , अंगणवाडी मदतनीस संगीता शेवाळे , शाळेचे मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर,उपशिक्षक श्री.राजाराम काटवटे सर , बाळासो बिळासकर , रमेश पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.शेवटी मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रमाची क्षणचित्रे खालीलप्रमाणे