आज गुरुवार दिनांक १५.०६.२०२३ रोजी जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे शैक्षणिक वर्षातील पहिला दिवस मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी शाळेत नवीन दाखलपात्र ६ विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व वही देऊन स्वागत करण्यात आले.तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. शाळेतील सर्व मुलींना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.आणि सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बेलदारवाडी गावच्या सरपंच माननीय योगिता सुधीर बिळासकर व उपसरपंच लक्ष्मी बाबासो शेवाळे , ग्रामपंचायत सदस्या राजश्री आनंदा शेवाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश पाटील , उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे , BRC शिराळाचे साधनव्यक्ती , तज्ञ मार्गदर्शक प्रदीप कदम सर , अंगणवाडी मदतनीस संगीता शेवाळे , शाळेचे मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर,उपशिक्षक श्री.राजाराम काटवटे सर , बाळासो बिळासकर , रमेश पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.शेवटी मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रमाची क्षणचित्रे खालीलप्रमाणे
No comments:
Post a Comment