🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल , ज्ञानोबा - तुकाराम , जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात आज जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे वेश परिधान केले होते तसेच सर्व मुलींनी साड्या परिधान केल्या होत्या.विठ्ठलाच्या रुपात इयत्ता ४ थी मधील जयराज तर रुक्मिणीच्या रुपात ३ री मधील अनुष्का आलेले होते.शाळेतील काही मुलींनी तुळशी वृंदावन आपल्या डोक्यावर घेतलेले होते.यामध्ये अंगणवाडी मधील सर्व मुले समाविष्ट झाली होती.सदरचा दिंडी सोहळा जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी पासून हनुमान मंदिर पर्यंत पायी विठ्ठलाच्या जयघोषात गेला तिथे हनुमान मंदिरास सर्व वारकऱ्यांनी प्रदक्षिणा घातली.त्यानंतर सर्वांनी हनुमानाचे दर्शन घेतले.आणि मंदिरातच रिंगण सोहळा साजरा करण्यात आला.पोलीस पाटील श्री.योगेश मस्कर यांनी छोट्या वारकऱ्यांना टाळ उपलब्ध करून दिला होता.सदर दिंडी सोहळा मंदिरात असताना ग्रामपंचायत सदस्या राजश्री आनंदा शेवाळे व पालक जयश्री चंद्रकांत शेवाळे यांनी फरसाणा व चहा वाटप केले. बाबासो मस्कर , सविता दिनकर जाधव, शारदा जाधव यांनी दिंडीत सहभागी असलेल्या सर्वांना चॉकलेट वाटप केले.सदर दिंडी सोहळ्यास सरपंच योगिता बिळासकर यांनी भेट दिली.दिंडी गावातून जात असताना गावातील नागरिक ही सदर दिंडीत सहभागी झाले होते.हनुमान मंदिर पासून शाळेत दिंडी आल्यानंतर माजी सरपंच धर्मेंद्र शेवाळे , बाबासो शेवाळे यांच्या वतीने सर्वांना चॉकलेट वाटप केले.अर्जुन मस्कर सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट पुड्याचे वाटप केले.यावेळी बेलदारवाडी गावचे पोलीस पाटील योगेश मस्कर, ग्रामपंचायत सदस्या राजश्री शेवाळे , चंद्रकांत शेवाळे , रमेश पाटील, माजी सरपंच धमेंद्र शेवाळे , अर्जुन मस्कर , बाबासो शेवाळे , बाबासो मस्कर, अंगणवाडी सेविका विजया पाटील , मदतनीस संगीता शेवाळे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.सदर दिंडी सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापक तानाजी कदम व राजाराम काटवटे सर यांनी केले.श्री.तानाजी कदम सर यांनी शेवटी दिंडी सोहळ्यास दिलेल्या प्रतिसादाबद्दल तसेच विद्यार्थ्यांना दिलेल्या खाऊ वाटप याबद्दल सर्वांचे आभार मानले व दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
No comments:
Post a Comment