नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Tuesday, April 21, 2026

बेलदारवाडी शाळेचे विविध स्पर्धा परीक्षेत उज्वल यश

बेलदारवाडी ता. शिराळा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे.






समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत पहिली मधील शर्वरी राजाराम काटवटे हिने ९८ गुण मिळवित राज्यात दुसरा नंबर क्रमांक मिळवला.तर चौथीमधील राजवी राजाराम काटवटे ही १८८ गुण मिळवून सांगली जिल्ह्यात प्रथम आली.तिसरीमधील रुद्रांश सुधीर बिळासकर व चौथीमधील रिद्धी संदीप मस्कर यांनी १८२ गुण मिळवून सांगली जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला.





विद्यार्थी टॅलेंट सर्च परीक्षेत शाळेतील एक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत , ४ विद्यार्थ्यांनी तालुका गुणवत्ता यादीत तर ६ विद्यार्थी केंद्र गुणवत्ता यादीत आले.राजवी काटवटे (४ थी )  २५८ गुण मिळवित जिल्ह्यात ८ वा क्रमांक , सई विकास शेटके (२ री ) ७२ गुण मिळवून शिराळा तालुक्यात ४ था क्रमांक तर रुद्रांश सुधीर बिळासकर (३ री), रिद्धी संदीप मस्कर (४थी) व शर्वरी काटवटे यांनी शिराळा तालुक्यात ५ वा क्रमांक मिळविला. दुसरीमधील शिवराज अमोल शेटके, पृथ्वीराज प्रशांत जाधव, तिसरीमधील वेदांतिका विक्रमसिंह बिळासकर , साईराज चंद्रकांत शेवाळे, शौर्य बाळासो बिळासकर, अथर्व प्रकाश शेवाळे आणि चौथीमधील आयुष अमोल महाडिक यांनी केंद्र गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.


गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये पहिली मधील शर्वरी राजाराम काटवटे हिने ८६ गुण मिळवून सांगली जिल्ह्यात दुसरा क्रमांक तर चौथीमधील राजवी काटवटे हिने २४६ गुण मिळवून शिराळा तालुक्यात आठवा क्रमांक मिळविला.रुद्रांश बिळासकर, वेदांतिका बिळासकर , साईराज शेवाळे आणि रिद्धी मस्कर यांनीही या परीक्षेत यश मिळवले.





मंथन सामान्यज्ञान परीक्षेत पहिली मधील शर्वरी काटवटे हिने ११४ गुण मिळवित शिराळा केंद्रात तिसरा क्रमांक मिळविला तर राजवी काटवटे हिने देखील २६८ गुण मिळवून  शिराळा केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला.रुद्रांश बिळासकर, वेदांतिका बिळासकर , साईराज शेवाळे आणि रिद्धी मस्कर यांनीही या परीक्षेत यश मिळवले.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना उपशिक्षक राजाराम काटवटे सर व शाळेचे मुख्याध्यापक तानाजी कदम सर यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बेलदारवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संदीप विश्वास मस्कर यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment