नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Thursday, June 18, 2026

बेलदारवाडी शाळेत ECA कंपनीकडून , वॉटर फिल्टर , दोन संगणक व प्रोजेक्टर भेट



सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बेलदारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ENVIRONMENT CONSERVATION ASSOCIATION ( ECA ) पुणे व Electrofine recycling pvt ltd यांचेकडून शाळेला वॉटर फिल्टर , एक प्रोजेक्टर व दोन संगणक संच भेट देण्यात आले. सदर कंपनीच्या अध्यक्षा विनिता दाते मॅडम यांनी यासाठी पुढाकार घेतला.बेलदारवाडी गावातील शाळेतील मुलांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी सदर कंपनीकडून शाळेत पाण्याचा फिल्टर इन्स्टॉल करून देण्यात आला. तसेच मुलांना अध्यापनात अधिक परिणामकारकपणे शिकवण्यासाठी प्रोजेक्टर व दोन संगणक संच भेट देण्यात आले. यासाठी सुराज्य पाणी फाउंडेशनचे अरुण मस्कर आणि स्वप्निल मस्कर यांचे यासाठी सहकार्य लाभले यावेळी गावच्या सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर , निवृत्त पोलिस अधिकारी श्री.विलास महादेव मस्कर , माजी सरपंच धर्मेंद्र शेवाळे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संदीप मस्कर ,CRP वैशाली बोंगे , पालक कुमार बोंगे , कमल विलास मस्कर ,सुषमा शेवाळे , स्वप्निल मस्कर , प्रचिती शेवाळे , जितेंद्र कदम , स्वप्नाली घारगे , पूर्वा बिळासकर , दिपाली जाधव , जयश्री शेवाळे , रंजना शेवाळे , उषा घारगे , मुख्याध्यापक तानाजी कदम सर ,उपशिक्षक राजाराम काटवटे सर , अंगणवाडी सेविका काजल शेवाळे मॅडम , संगीता शेवाळे मॅडम यांच्या बरोबर गावातील इतर ग्रामस्थ पालक , उपस्थित होते.

बेलदारवाडी शाळेत विद्यार्थ्यांना आंब्याचे रोप भेट

 



                                           बेलदारवाडी ता.शिराळा येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सुराज्य पाणी फाऊंडेशन बेलदारवाडी यांच्याकडून आंब्याचे रोप भेट देण्यात आले. रोपांची लागवड व संगोपन कसे करावे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. तसेच शाळा परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सदर रोपे भेट देण्यासाठी सुराज्य पाणी फाऊंडेशनचे अरुण मस्कर यांचे यासाठी सहकार्य लाभले. यावेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर , निवृत्त पोलिस अधिकारी श्री.विलास महादेव मस्कर , माजी सरपंच धर्मेंद्र शेवाळे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संदीप मस्कर ,CRP वैशाली बोंगे , पालक कुमार बोंगे , कमल विलास मस्कर ,सुषमा शेवाळे , स्वप्निल मस्कर , प्रचिती शेवाळे , जितेंद्र कदम , स्वप्नाली घारगे , पूर्वा बिळासकर , दिपाली जाधव , जयश्री शेवाळे , रंजना शेवाळे , उषा घारगे , मुख्याध्यापक तानाजी कदम सर ,उपशिक्षक राजाराम काटवटे सर , अंगणवाडी सेविका काजल शेवाळे मॅडम , संगीता शेवाळे मॅडम यांच्या बरोबर गावातील इतर ग्रामस्थ पालक , उपस्थित होते.

बेलदारवाडी शाळेत दाखल होणाऱ्या मुलांची रथातून मिरवणूक

 




सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बेलदारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करून शिक्षणाच्या प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.

प्रवेशोत्सवानिमित्त पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची गावातून रथातून मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. शाळेत आगमन झाल्यानंतर गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला बेलदारवाडी गावच्या सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर , निवृत्त पोलिस अधीकारी श्री.विलास महादेव मस्कर, जिल्ह्यातून लेखा विभागाचे अधिकारी श्री.गणेश पुजारी साहेब. , समग्र शिक्षाकाचे तालुका समन्वयक श्री.नितीन पाटील , माजी सरपंच धर्मेंद्र शेवाळे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संदीप मस्कर ,CRP वैशाली बोंगे , पालक कुमार बोंगे , कमल विलास मस्कर ,सुषमा शेवाळे , स्वप्निल मस्कर , प्रचिती शेवाळे , जितेंद्र कदम , स्वप्नाली घारगे , पूर्वा बिळासकर , दिपाली जाधव , जयश्री शेवाळे , रंजना शेवाळे , उषा घारगे यांच्या बरोबर गावातील इतर ग्रामस्थ पालक , उपस्थित होते.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरण करण्यात आले. तसेच सुराज्य पाणी फाऊंडेशन, बेलदारवाडी आणि Environment Conservation Association (ECA), पुणे यांच्या अध्यक्षा विनिता दाते मॅडम सहकार्याने शाळेला वॉटर फिल्टर, दोन संगणक संच आणि डिजिटल शिक्षणासाठी प्रोजेक्टर भेट देण्यात आला.यासाठी अरुण मस्कर यांचे सहकार्य लाभले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सुराज्य पाणी फाऊंडेशनतर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला आंब्याचे रोप देण्यात आले. रोपांची लागवड व संगोपन कसे करावे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. तसेच शाळा परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पालक आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विशेषतः पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीसाठी रथ उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांचे कौतुक करण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक तानाजी कदम, राजाराम काटवटे, अंगणवाडी सेविका काजल शेवाळे तसेच मदतनीस संगीता शेवाळे यांनी केले.