नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Friday, November 24, 2023

बेलदारवाडी ता.शिराळा येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आगमन


 
केंद्रसरकारच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारने सुरू केली आहे.सदर संकल्प यात्रेचे उद्घाटन पालकमंत्री श्री.सुरेश खाडे व जिल्हाधिकारी मा.श्री. राजा दयानिधी यांच्या हस्ते आज सांगली येथे करण्यात आले.त्यानंतर या संकल्पयात्रेचे आगमन शुक्रवार दिनांक २४.११.२०२३ रोजी बेलदारवाडी ता.शिराळा येथे आगमन झाले.यावेळी गावच्या सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर , उपसरपंच सौ.लक्ष्मी बाबासो शेवाळे , ग्रामपंचायत सदस्य श्री.धर्मेंद्र विलास शेवाळे , श्री.आनंदा महादेव मस्कर, श्री.मारुती धोंडीबा घारगे ,ग्रामपंचायत सदस्या सौ.मनिषा तानाजी मदने ,सौ.राजश्री आनंदा शेवाळे , सौ. सुनिता लालासो धुमाळ ,  श्री.सुधीर शशिकांत बिळासकर , श्री.पांडुरंग मदने , श्री. हंबीर शेवाळे , ग्रामसेवक श्री.प्रमोद माळी , मुख्याध्यापक श्री तानाजी कदम , शिक्षक राजाराम काटवटे आणि बेलदारवाडी गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

                            यावेळी अद्यापही ज्या योजनांचे लाभ लाभार्थी पर्यंत पोहोचले नाहीत , त्यांच्यापर्यंत योजना पोहोचविणे , माहितीचा प्रसार व योजनांबद्दल जागृती निर्माण करणे. सरकारी योजनांच्या लाभार्थी सोबत संवाद साधणे असा या यात्रेचा उद्देश आहे.

                             या अंतर्गत बेलदारवाडी गावातील ग्रामस्थांना आज विविध योजनांबद्दल माहिती गाडीवर असलेल्या LED स्क्रीन द्वारे दाखविण्यात आली.गावातील बहुसंख्य नागरिकांनी याची माहिती घेतली.गावातील विविध योजनांमधील लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.त्याची क्षणचित्रे खालीलप्रमाणे


 















No comments:

Post a Comment