नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Saturday, June 29, 2024

अभिनंदनीय निवड

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*🌹🌹अभिनंदनीय निवड🌹🌹*

               *आज जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे झालेल्या  पालक मीटिंगमध्ये शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ आणि माता पालक संघ यांची पूर्नरचना करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी _श्री.संदिप विश्वास मस्कर_ व उपाध्यक्ष पदी _श्री.शंकर किसन जाधव_ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.*

               *शिक्षक पालक संघाच्या अध्यक्ष पदी _श्री.विकास जोतिराम शेटके_ यांची तर माता पालक संघाच्या अध्यक्षपदी _सौ.सुजाता चंद्रकांत शेवाळे_ यांची निवड करण्यात आली.सदर पालक मीटिंगमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी मीटिंगमध्ये  श्री.सुधीर बिळासकर, श्री चंद्रकांत शेवाळे ,श्री.शिवाजी मस्कर , श्री.बाळासो बिळासकर , श्री बाबासो शेवाळे , सौ.जयश्री शेवाळे ,सौ उज्वला मस्कर, सौ.कविता जाधव , सौ.रोहिणी शेटके , सौ.संजीवनी शेटके , पूर्वा बिळासकर अंगणवाडी सेविका सौ.विजया पाटील मॅडम , शिक्षक श्री.राजाराम काटवटे सर , मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित होते.*









शाळा व्यवस्थापन समिती


शिक्षक पालक संघ


माता पालक संघ





Monday, May 20, 2024

आकाशात झेपावलेली पाखरे २० वर्षानंतर परतली घरट्यात

 


२० वर्षानंतर आकाशात झेपावलेली पाखरे परतली घरट्यात


दु:ख अडवायला उंबऱ्यासारखा    
 मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ...

                                   कवी अनंत राऊत लिखित मैत्री विषयीच्या कवितेतील ओळींचा पुरेपूर अनुभव आज स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने जमलेल्या सर्व मित्रांना आला.निमित्त होते आझाद विद्यालय कासेगाव तालुका वाळवा येथून २००३-०४ मध्ये बाहेर पडलेल्या मित्रांचा माजी विद्यार्थी मेळावा.रविवार दि.१९.०५.२०२४ रोजी आझाद विद्यालय कासेगाव येथे २० वर्षांपूर्वीच्या मित्रांचा माजी विद्यार्थी मेळावा अतिशय उत्साहात पार पडला.
                          सर्वप्रथम हलगीच्या निनादात सर्व गुरूंचे आणि विद्यार्थ्यांचे आगमन झाले.त्यानंतर सर्वांनी मैदानात असलेल्या लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.यानंतर शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.आडके सर यांच्या हस्ते शालेय परिसरामध्ये रोप लावून कार्यक्रमाची सुरुवात केली.यानंतर सर्वजण शाळेतील वर्गात आले.

शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.सुभाष आडके सर आणि श्री. एम.जे. पाटील सर व इतर मान्यवरांच्या हस्ते  लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते आपल्या जुन्या शिक्षकांचे रोप आणि स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

उत्सव हा मैत्रीचा ..
उत्सव हा पुर्नभेटीचा ...
उत्सव हा जुन्या आठवणी जागविण्याचा ....

                             सर्व विद्यार्थ्यांनी सध्या कोण काय करत आहे याविषयी सांगितले.मिलिंद सुतार , राजाराम काटवटे  व माधुरी पाटील यांनी आपल्या शाळेविषयी आणि आपल्या गुरुविषयींच्या आठवणी जाग्या केल्या.कोण इंजिनिअर झाले तर कोण डॉक्टर झाले , कोण पोलीस झाले तर कोण सैनिक झाले , कोण पाटबंधारे खात्यात नोकरीला लागले तर कोण शिक्षक झाले , कोण बिझनेस करते तर कोण शेती करतो पण स्वत:च्या पायावर सर्वजण उभे राहिलो कारण होती फक्त आणि फक्त ही आझाद विद्यालय कासेगावची शाळा.
       
                                         यानंतर शाळेत कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या शिक्षकांनी सर्वांना उपदेशपर मार्गदर्शन केले.हिंदी विषयासाठी अध्यापन करणारे श्री.जे.बी.काळे सर यांनी मंदिरात मदत करण्या ऐवजी आपल्या शाळेस मदत करावी जेणेकरून जी मुले गरीब आहेत त्याचा त्यांना फायदा होईल असे सांगितले. विज्ञान विषयासाठी अध्यापन करणारे श्री.बी.एस.पाटील सर यांनी आपल्या आई - वडिलांना कधीच विसरू नका असे सांगितले.यानंतर भूगोल विषयाचे माजी शिक्षक श्री.एम. जे.पाटील सर  , शारीरिक शिक्षण विषयाचे श्री.जे.आर.पाटील सर , चित्रकलेचे गुरव सर यांनी सर्वाना मार्गदर्शन केले .यानंतर शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.आडके सर यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ते लक्षात ठेवून ज्या क्षेत्रात आहात तेथे प्रामाणिकपणे काम करा आणि आपल्या शाळेस मदत करण्याचे आवाहन केले.यावेळी  श्री. एच.एस.पाटील सर ,श्री. एस.आर.गोंदील सर आणि मोरे सर उपस्थित होते. १० वी बॅच २००३-०४ च्या वतीने शाळेस बास्केटबॉल संच भेट देण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.सुयोग गावडे यांनी अतिशय सुंदर केले.
शाळेत झालेल्या या कार्यक्रमानंतर कृष्णाकाठ ॲग्रो  रिसाॅर्ट तांबवे - बहे येथे पुढील कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी रवाना झाले.तेथे स्वरांगण ग्रुप कराड येथील कलाकारांनी संगीताचा बहारदार कार्यक्रम पेश केला .आणि मित्रांच्या जुन्या खेळांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी विविध Funny Games घेण्यात आले.तळ्यात मळ्यात , फुगा फुगविणे , तो फुगा दोन्ही पायांच्या मध्ये धरून उड्या मारणे , फुगा फोडणे यासारखे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.त्यामध्ये सर्व मित्रमंडळीना खूप आनंद आला. ‌त्यानंतर उपस्थित  सर्वाना स्नेहमेळाव्याची आठवण म्हणून स्मृतीचिन्ह देण्यात आले. 









Funny Game 🎯🎯🎯

                                           Funny Games झाल्यानंतर दुपारची सुट्टी करण्यात आली म्हणजेच सर्व शिक्षक आणि मित्रमंडळी यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्वजण विविध गप्पामध्ये रमले.यावेळी सर्वांनी कृष्णा नदीत आपल्या सवंगड्यांसह बोटिंगचा आनंद घेतला.मैत्रिणी एकमेकांना खूप दिवसांनी भेटल्यामुळे आठवण म्हणून सेल्फी घेत होत्या.तर कोणी झोपाळ्यावर गप्पा मारत जुन्या आठवणी जागे करत होते.
हळूहळू निरोपाचा क्षण जवळ येत होता पण सर्वांचे पाय काही जाग्याहून हलत नव्हते.तरीपण नाईलाज म्हणून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला तो पुन्हा असेच एक दिवस भेटण्याचे वचन देऊनच.
खरच आपल्याला पूर्वी जगलेले दिवस पुन्हा जगता आले असते तर किती बरे झाले असते.
मित्रांचे जीवनातील स्थान खूप महत्वाचे असतं. रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते हे घट्ट आणि अखंड असते.याचा अनुभव या निमित्ताने आला.
                                            सदर गेट टुगेदर यशस्वी करण्यासाठी मुलांमधून स्वप्नील पाटील , सुयोग गावडे , विकास सुतार , संदिप रामणे , माणिक गावडे , कोंडीबा शेंडगे , विशाल माने , राजेंद्र शिंदे , सिद्धेश्वर शिंदे , संजय माळी यांनी तर मुलींमधून माधुरी पाटील , श्वेताली पाटील , मंदाकिनी पाटील , अर्चना सन्मुख , रेणुका सुतार , सुजाता शिणगारे , रुपाली शिणगारे यांनी विशेषतः खूप प्रयत्न केले.तसेच जे ज्ञात अज्ञात मित्र मंडळी आहेत त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला त्यामुळे त्यांना माझ्याकडून आणि आझाद १० वी बॅच २००३-०४ कडून मनपूर्वक धन्यवाद तुमच्यामुळेच आज आम्ही मित्र मंडळीना पुन्हा भेटू शकलो.
                                          आज या कार्यक्रमात इंजिनिअर असलेले सुयोग गावडे ,  बिझनेसमन असलेले  स्वप्नील पाटील , विकास सुतार , संदिप रामणे विशाल गावडे , मिलिंद सुतार , डॉक्टर माणिक गावडे , डॉ.राजेंद्र शिंदे  , पाटबंधारे खात्यात कार्यरत कोंडीबा शेंडगे , पुण्यात कंपनी मध्ये मॅनेजर पदी असणारा आदित्य वाघावकर ,छत्रपती संभाजीनगर मध्ये कार्यरत इंजिनिअर प्रमोद यादव , पोलीसमध्ये कार्यरत असलेले माणिक पाटील , संग्राम पाटील , रोहित कुंभार  ,  Army मध्ये कार्यरत प्रशांत रणदिवे , Para Militery मध्ये कार्यरत अविनाश चव्हाण ,  पुण्यात महिंद्र कंपनीत कार्यरत अमोल पाटील , आणि प्रमोद जंगम / बंडा , कबड्डीपट्टू म्हणून नावाजलेले काशिलिंग आडके आणि अमोल ठोंबरे तसेच   , वनविभागामध्ये कार्यरत  संजय माळी , इस्लामपूर आगारात कार्यरत असणारा सुनिल मोहिते , , Tractor Garrage असलेला  प्रदीप  माळी  ,सोने चांदी व्यावसायिक प्रशांत पोतदार , कासेगाव मध्ये छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांची जयंती भव्य दिव्य साजरी करण्यात मोलाचा हात असणारा  आभिजीत पाटील , कॉम्पुटर मध्ये तज्ञ विश्वनाथ देसाई , प्रगतशील शेतकरी विशाल माने , संग्राम  माळी , प्रशांत पाटील , अरुण डबाणे  यांना भेटून छान वाटले.तर मुलींमधून माधुरी पाटील , श्वेताली पाटील , मंदाकिनी पाटील ,सुरेखा माळी , सविता माळी , आश्विनी पाटील , रेणुका सुतार , रुपाली पाटील , स्वाती शिनगारे , स्वाती सावंत , जयवंती पाटील ,  पुजा माने , परवीन मुल्ला , अर्चना परीट , प्रतिभा जगताप , उषा व प्रतिभा मोरे , अर्चना सन्मुख , लता भालकर तसेच अनेक मुली उपस्थित होत्या .सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल आनंद वाटला. 
                                          तसेच या कार्यक्रमासाठी यायची खूप इच्छा असून सुद्धा ARMY मध्ये असून रजा न मिळाल्याने येऊ न शकलेले रामचंद्र कराडे , दत्तात्रय पाटील , मुंबईमध्ये इलेक्शन ड्युटी लागल्याने येऊ न शकलेला विनायक पाटील , तसेच मुंबईतून येऊ न शकलेला सिद्धेश्वर शिंदे  , वासिम आत्तार , स्वप्नील गावडे , योगेश मदने , जमीर शेख  , सुधीर देसाई , सुनील कुंभार , अमृत कुंभार , अतुल निकम , उद्धव शिद , सागर वगरे , सागर कांबळे , अविनाश कांबळे , विनोद  कांबळे , जयंत माने , परशुराम माळी , संतोष आडके / गणा  , प्रविण आडके , जमीर शेख , महादेव जाधव या मित्रांची  कमतरता आज जाणवली.तुम्ही सर्वजण असता तर नक्कीच आम्हाला आणखी खूप चांगले वाटले असते.
                                                  वीस वर्षानंतर झालेल्या मित्रांच्या या भेटीचा आनंद अवर्णनीय आहे.मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक घट्ट असते.मैत्रीचा धागा हा कायम मनात विणला जातो.स्नेह मेळाव्याचा कालचा हा दिवस असाच माझ्या मनामध्ये कायम आठवणी देत जाईल.शेवटी इथेच थांबतो.पुन्हा भेटूया नंतर कधीतरी.


आपलाच
प्राथमिक शिक्षक झालेला मित्र 
श्री. राजाराम प्रकाश काटवटे 
जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता. शिराळा 
मोबाईल क्रमांक - 9890943956