नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Friday, November 24, 2023

बेलदारवाडी ता.शिराळा येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आगमन


 
केंद्रसरकारच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारने सुरू केली आहे.सदर संकल्प यात्रेचे उद्घाटन पालकमंत्री श्री.सुरेश खाडे व जिल्हाधिकारी मा.श्री. राजा दयानिधी यांच्या हस्ते आज सांगली येथे करण्यात आले.त्यानंतर या संकल्पयात्रेचे आगमन शुक्रवार दिनांक २४.११.२०२३ रोजी बेलदारवाडी ता.शिराळा येथे आगमन झाले.यावेळी गावच्या सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर , उपसरपंच सौ.लक्ष्मी बाबासो शेवाळे , ग्रामपंचायत सदस्य श्री.धर्मेंद्र विलास शेवाळे , श्री.आनंदा महादेव मस्कर, श्री.मारुती धोंडीबा घारगे ,ग्रामपंचायत सदस्या सौ.मनिषा तानाजी मदने ,सौ.राजश्री आनंदा शेवाळे , सौ. सुनिता लालासो धुमाळ ,  श्री.सुधीर शशिकांत बिळासकर , श्री.पांडुरंग मदने , श्री. हंबीर शेवाळे , ग्रामसेवक श्री.प्रमोद माळी , मुख्याध्यापक श्री तानाजी कदम , शिक्षक राजाराम काटवटे आणि बेलदारवाडी गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

                            यावेळी अद्यापही ज्या योजनांचे लाभ लाभार्थी पर्यंत पोहोचले नाहीत , त्यांच्यापर्यंत योजना पोहोचविणे , माहितीचा प्रसार व योजनांबद्दल जागृती निर्माण करणे. सरकारी योजनांच्या लाभार्थी सोबत संवाद साधणे असा या यात्रेचा उद्देश आहे.

                             या अंतर्गत बेलदारवाडी गावातील ग्रामस्थांना आज विविध योजनांबद्दल माहिती गाडीवर असलेल्या LED स्क्रीन द्वारे दाखविण्यात आली.गावातील बहुसंख्य नागरिकांनी याची माहिती घेतली.गावातील विविध योजनांमधील लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.त्याची क्षणचित्रे खालीलप्रमाणे


 















Tuesday, November 14, 2023

बेलदारवाडी शाळेस पोर्टेबल ॲम्प्लिफायर भेट दिलेली बातमी

 विविध वर्तमानपत्रांमध्ये आलेली शाळेची बातमी



 सकाळ पेपर दिनांक १४.११.२०२३ मधील सांगली TODAY पुरवणीत पान नंबर ६ वर आलेली बातमी 


तरुण भारत पेपर दिनांक १४.११.२०२३ मधील आजच्या सांगली पुरवणीत पान नंबर ३ वर आलेली बातमी




सांगली नवयुग पेपर दिनांक १४.११.२०२३ मधील पान नंबर ४ वर आलेली बातमी

Thursday, November 2, 2023

अंगणवाडी क्रमांक ९९ बेलदारवाडी येथे ग्रामपंचायती मार्फत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

 

अंगणवाडी क्रमांक ९९ बेलदारवाडी तालुका शिराळा येथे ग्रामपंचायती मार्फत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.सदर गणवेशाचे वाटप बेलदारवाडी गावच्या सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर , उपसरपंच सौ.लक्ष्मी बाबासो शेवाळे व ग्रामपंचायत सदस्या सौ.मनिषा तानाजी मदने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री.सुधीर बिळासकर, श्री.चंद्रकांत शेवाळे , ग्रामसेवक श्री.प्रमोद माळी , मुख्याध्यापक तानाजी कदम , राजाराम काटवटे , अंगणवाडी सेविका सौ.विजया पाटील मॅडम , इतर ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.त्याची क्षणचित्रे खालीलप्रमाणे

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️






Saturday, October 21, 2023

बेलदारवाडी शाळेस पोर्टेबल ॲम्प्लिफायर भेट

 📻📻📻📻📻📻📻📻📻📻📻📻

🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️

*बेलदारवाडी शाळेस पोर्टेबल ॲम्प्लिफायर भेट*



बेलदारवाडी ता. शिराळा येथील श्री.शहाजी विष्णू मस्कर यांनी आपले वडील कै.विष्णू सावळा मस्कर यांचे स्मरणार्थ गावातील जिल्हा परिषद शाळेला पोर्टेबल ॲम्प्लिफायर भेट दिला.त्यांच्या वडिलांचे तृतीय वर्षश्राद्ध असताना इतर खर्च कमी करीत आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सदर वस्तू शाळेला भेट दिली.त्याच्या उपयोग विद्यार्थ्यांच्या विविध शालेय कार्यक्रमासाठी होणार आहे.सदर कार्यक्रमासाठी शहाजी विष्णू मस्कर , बाबासो मारूती शेवाळे (उपसरपंच), भानुदास राजाराम खोत,जयकर चव्हाण, रेवणनाथ भोसले ( महाराज) तानाजी कदम , राजाराम काटवटे, गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

📻📻📻📻📻📻📻📻📻📻📻📻

🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️



विविध वर्तमानपत्रांमध्ये आलेली शाळेची बातमी


 सकाळ पेपर दिनांक १४.११.२०२३ मधील सांगली TODAY पुरवणीत पान नंबर ६ वर आलेली बातमी 


तरुण भारत पेपर दिनांक १४.११.२०२३ मधील आजच्या सांगली पुरवणीत पान नंबर ३ वर आलेली बातमी




सांगली नवयुग पेपर दिनांक १४.११.२०२३ मधील पान नंबर ४ वर आलेली बातमी

Saturday, September 16, 2023

लेफ्टनंट कर्नल , कॅप्टन श्री.सुनिल ईश्वरा मस्कर यांचेकडून UPS BATTERY व SPEAKER शाळेस भेट

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

📘📘📘📘📘📘📘📘📘📘

आज जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे पालक सभा संपन्न झाली. सदर सभेत सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी चर्चा करण्यात आली.त्यानंतर बेलदारवाडी गावचे रिटायर्ड लेफ्टनंट सुभेदार , कॅप्टन श्री.सुनिल ईश्वरा मस्कर यांनी दिलेल्या ३००० रुपयांमधून आपल्या जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी शाळेसाठी संगणकासाठी आवश्यक असणारी UPS BATTERY  व SPEAKER आज सर्व पालकांच्या उपस्थितीत शाळेस सुपूर्द करण्यात आला.त्यांनी केलेल्या या अनमोल मदतीबद्दल शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.त्यानंतर शाळेच्या विविध विषयांवर मीटिंगमध्ये चर्चा करण्यात आली.शेवटी मुख्याध्यापक तानाजी कदम सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

📘📘📘📘📘📘📘📘📘📘







Thursday, September 7, 2023

बेलदारवाडी येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती






आज ग्रामपंचायत बेलदारवाडी तालुका शिराळा येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.यावेळी बेलदारवाडी गावच्या सरपंच योगिता सुधीर बिळासकर , ग्रामपंचायत सदस्या सौ.मनिषा तानाजी मदने , श्री.लालासो धुमाळ , श्री.सुधीर बिळासकर , श्री.तानाजी मदने , श्री.विजय तटले , श्री.तानाजी कदम सर , श्री. काटवटे सर , सौ.शेवाळे मॅडम, तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


Tuesday, August 15, 2023

आमच्या बेलदारवाडी शाळेचे विद्यार्थी

 








बेलदारवाडी येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*आज मंगळवार दिनांक १५.०८.२०२३ रोजी ग्रामपंचायत बेलदारवाडी , जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी , अंगणवाडी क्रमांक ९९ बेलदारवाडी ता.शिराळा येथे हर घर तिरंगा अभियान ,मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत  स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायत बेलदारवाडी व जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर यांच्या हस्ते करण्यात आले तर शाळेचे ध्वजारोहण रिटायर्ड फौजी श्री.बाळासो मारुती मस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हणण्यात आले. त्यानंतर रिटायर्ड लेफ्टनंट सुभेदार श्री.सुनिल ईश्वरा मस्कर यांनी केक आणला होता.तो सर्व विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत कापण्यात आला.त्यानंतर वीरोंको वंदन व सन्मान या उपक्रमाअंतर्गत आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले रिटायर्ड नायब सुभेदार श्री.आविनाश विलास शेवाळे , रिटायर्ड असिस्टंट ASI श्री.आनंदा परसू शेवाळे,रिटायर्ड लेफ्टनंट सुभेदार श्री.सुनिल ईश्वरा मस्कर , मुंबई पोलीस ASI श्री.विलास नामदेव मस्कर , उत्तम दगडु शेवाळे Army , इंजिनियर श्री.संतोष कृष्णा शेवाळे , बेस्ट मध्ये रिटायर्ड श्री.बाबासाहेब यशवंत मस्कर , श्री.निवृत्ती कोंडीबा घारगे ( रिटायर्ड NAVY अधिकारी ) आदी सर्वांचे गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.त्यानंतर विविध परीक्षेत व स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली.शाळेतील विद्यार्थ्यांना खालील नागरिकांकडून खाऊ मिळाला.*

*👉 सुनिल ईश्वरा मस्कर - केक*

*👉 आविनाश शेवाळे - लाडू*

*👉 सरपंच सौ. योगिता सुधीर बिळासकर - चिक्की व बिस्किटे*

*👉श्री. लालासो धुमाळ - चॉकलेट*

*👉श्री. योगेश मस्कर पोलीस पाटील - चॉकलेट*

*👉 चंद्रकांत शेवाळे - राजगिरा लाडू*

*👉 विलास मस्कर - लाडू*

*👉 जयवंत घारगे - चॉकलेट*

*यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप मिळाला.त्याबद्दल सर्वांचे आभार*

 *सदर कार्यक्रमासाठी उपसरपंच सौ.लक्ष्मी शेवाळे , ग्रामपंचायत सदस्य सौ.मनिषा तानाजी मदने ,ग्रामपंचायत सदस्य सौ. सुनिता लालासो धुमाळ , ग्रामपंचायत सदस्या जयश्री हंबीर शेवाळे,  पोलीस पाटील श्री.योगेश मस्कर , सुधीर बिळासकर , बाळासो बिळासकर , दिनकर जाधव , लालासो धुमाळ , शिक्षकवृंद व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


ध्वजारोहण व केक कापताना व्हिडीओ 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

स्वातंत्र्यदिन क्षणचित्रे