नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Tuesday, August 15, 2023

आमच्या बेलदारवाडी शाळेचे विद्यार्थी

 








बेलदारवाडी येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*आज मंगळवार दिनांक १५.०८.२०२३ रोजी ग्रामपंचायत बेलदारवाडी , जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी , अंगणवाडी क्रमांक ९९ बेलदारवाडी ता.शिराळा येथे हर घर तिरंगा अभियान ,मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत  स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायत बेलदारवाडी व जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर यांच्या हस्ते करण्यात आले तर शाळेचे ध्वजारोहण रिटायर्ड फौजी श्री.बाळासो मारुती मस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हणण्यात आले. त्यानंतर रिटायर्ड लेफ्टनंट सुभेदार श्री.सुनिल ईश्वरा मस्कर यांनी केक आणला होता.तो सर्व विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत कापण्यात आला.त्यानंतर वीरोंको वंदन व सन्मान या उपक्रमाअंतर्गत आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले रिटायर्ड नायब सुभेदार श्री.आविनाश विलास शेवाळे , रिटायर्ड असिस्टंट ASI श्री.आनंदा परसू शेवाळे,रिटायर्ड लेफ्टनंट सुभेदार श्री.सुनिल ईश्वरा मस्कर , मुंबई पोलीस ASI श्री.विलास नामदेव मस्कर , उत्तम दगडु शेवाळे Army , इंजिनियर श्री.संतोष कृष्णा शेवाळे , बेस्ट मध्ये रिटायर्ड श्री.बाबासाहेब यशवंत मस्कर , श्री.निवृत्ती कोंडीबा घारगे ( रिटायर्ड NAVY अधिकारी ) आदी सर्वांचे गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.त्यानंतर विविध परीक्षेत व स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली.शाळेतील विद्यार्थ्यांना खालील नागरिकांकडून खाऊ मिळाला.*

*👉 सुनिल ईश्वरा मस्कर - केक*

*👉 आविनाश शेवाळे - लाडू*

*👉 सरपंच सौ. योगिता सुधीर बिळासकर - चिक्की व बिस्किटे*

*👉श्री. लालासो धुमाळ - चॉकलेट*

*👉श्री. योगेश मस्कर पोलीस पाटील - चॉकलेट*

*👉 चंद्रकांत शेवाळे - राजगिरा लाडू*

*👉 विलास मस्कर - लाडू*

*👉 जयवंत घारगे - चॉकलेट*

*यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप मिळाला.त्याबद्दल सर्वांचे आभार*

 *सदर कार्यक्रमासाठी उपसरपंच सौ.लक्ष्मी शेवाळे , ग्रामपंचायत सदस्य सौ.मनिषा तानाजी मदने ,ग्रामपंचायत सदस्य सौ. सुनिता लालासो धुमाळ , ग्रामपंचायत सदस्या जयश्री हंबीर शेवाळे,  पोलीस पाटील श्री.योगेश मस्कर , सुधीर बिळासकर , बाळासो बिळासकर , दिनकर जाधव , लालासो धुमाळ , शिक्षकवृंद व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


ध्वजारोहण व केक कापताना व्हिडीओ 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

स्वातंत्र्यदिन क्षणचित्रे









































Sunday, August 13, 2023

हर घर तिरंगा अभियान बेलदारवाडी दिवस - पहिला

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

ग्रामपंचायत बेलदारवाडी , जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी , अंगणवाडी क्रमांक ९९ बेलदारवाडी ता.शिराळा येथे हर घर तिरंगा अभियान अंतर्गत पहिल्या दिवशी ध्वजारोहण करून प्रभातफेरी काढण्यात आली.ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत सदस्या सौ.मनिषा मदने यांच्या हस्ते तर शाळेच्या ध्वजाचे बेलदारवाडी गावचे पोलीस पाटील श्री.योगेश मस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्याची क्षणचित्रे खालीलप्रमाणे

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳