जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा शाळेतील मुलांनी समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षेत उज्वल यश मिळवले.शाळेतील तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. दुसरीमधील रुद्रांश सुधीर बिळासकर याने ९४ गुण मिळवून शिराळा केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला. तिसरीमधील राजवी राजाराम काटवटे हिनेदेखील १८० गुण मिळवून शिराळा केंद्रात व्दितीय क्रमांक मिळवला.तर दुसरीमधील साईराज चंद्रकांत शेवाळे याने ९० गुण मिळवून शिराळा केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला. या परीक्षेत वेदांतिका विक्रमसिंह बिळासकर, शौर्य बाळासो बिळासकर , रिद्धी संदीप मस्कर , आयुष अमोल महाडिक , अनुष्का चंद्रकांत शेवाळे , आरोही सुहास मस्कर , देवराज अमोल शेटके , रोहन बाळासो बिळासकर , ओम तानाजी मस्कर , आरोही शंकर जाधव व सोहम शिवाजी मस्कर या विद्यार्थिनी या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना राजाराम काटवटे सर व तानाजी कदम सर यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.
No comments:
Post a Comment