



.jpg)

बेलदारवाडी शाळेस सीसीटीव्ही कॅमेरा व संच भेट
जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता. शिराळा येथे मुंबई येथील उद्योजक श्री.शशिकांत डुंगरशी वीरा , श्री.जिगर शशिकांत वीरा , श्री.जयेश श्रीकृष्ण कदम आणि श्री.शहाजी विष्णू मस्कर यांच्यावतीने शाळेस सीसीटीव्ही कॅमेरा व संच भेट देण्यात आला. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.त्यांना पाहुण्यांकडून खाऊ वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमावेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर ,उपसरपंच सौ लक्ष्मी बाबासो शेवाळे , रिटायर्ड फौजी श्री. आविनाश विलास शेवाळे , श्रीम.सोनाबाई विष्णू मस्कर , श्री.विकास शेटके , श्री.बाबासो शेवाळे , श्री. प्रकाश शेवाळे , अंगणवाडी मदतनीस सौ.संगीता शेवाळे , उपशिक्षक श्री.राजाराम काटवटे सर तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर यांनी शाळेस सीसीटीव्ही कॅमेरा भेट दिल्याबद्दल आभार मानले.