नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Monday, August 26, 2024

बेलदारवाडी शाळेस शालेय साहित्य भेट

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

आज सोमवार दि.२६.०८.२०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे समीक्षा ( राधा ) शहाजी मस्कर हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कुटुंबियांकडून शाळेतील व अंगणवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना २५०० रुपयांचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना ४ विविध प्रकारच्या वह्या , रंगीत खडू व लेखन साहित्य भेट देण्यात आले तर अंगणवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना पाटी व अंकलिपी भेट देण्यात आली.यावेळी शहाजी मस्कर यांच्या आई सोनाबाई विष्णू मस्कर यांच्या हस्ते सर्व मुलांना साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संदिप मस्कर , चंद्रकांत शेवाळे , कुमार बोंगे , नम्रता मस्कर , आदित्य मस्कर , मुख्याध्यापक तानाजी कदम सर , शिक्षक राजाराम काटवटे, अंगणवाडी सेविका संगीता शेवाळे उपस्थित होत्या.शहाजी विष्णू मस्कर यांनी आपल्या गावातील शाळेस व अंगणवाडीला केलेल्या अनमोल मदतीबद्दल शाळेच्या वतीने खूप खूप आभार.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼












No comments:

Post a Comment