नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Thursday, May 2, 2024

बेलदारवाडी येथे मतदार संवादफेरी

 


आज बेलदारवाडी ता.शिराळा येथे मतदार संवादफेरी अंतर्गत शिराळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.संतोष राऊत  साहेब यांनी भेट दिली.या वेळी त्यांनी गावातील मतदारांशी चर्चा केली.गावातील मतदान वाढविण्यासाठी राऊत साहेब यांनी मतदारांना मार्गदर्शन केले.या वेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान टक्केवारी वाढविण्याबाबत आवाहन केले.यावेळी बेलदारवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर, उपसरपंच सौ.लक्ष्मी बाबासो शेवाळे , पोलीस पाटील श्री.योगेश मस्कर , श्री.सुधीर बिळासकर , ग्रामपंचायत सदस्य सौ.मनिषा मदने , राजश्री शेवाळे , सुनिता धुमाळ , ग्रामसेवक श्री.प्रमोद माळी , शिक्षक श्री. तानाजी कदम , श्री.राजाराम काटवटे, अंगणवाडी सेविका सौ.विजया पाटील ,सौ. संगीता शेवाळे ,आशा स्वयंसेविका सौ.सुजाता शेवाळे , CRP सौ.वैशाली बोंगे , ग्रामपंचायत कर्मचारी श्री.विजय तटले तसेच गावातील महिला व पुरुष मतदार उपस्थित होते.

















बेलदारवाडी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात साजरा

 आज 1 मे 2024 रोजी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात पार पडला.ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण जेष्ठ अंगणवाडी सेविका सौ.विजया पाटील मॅडम यांच्या हस्ते झाले तर शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत शेवाळे यांचे हस्ते करण्यात आले.त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना निकालाचे वाटप करण्यात आले.यावेळी बेलदारवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर , पोलीस पाटील श्री.योगेश मस्कर , उपसरपंच सौ.लक्ष्मी शेवाळे , श्री.सुधीर बिळासकर , आशा सेविका सुजाता शेवाळे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.त्याची क्षणचित्रे खालीलप्रमाणे

















*विविध गुणदर्शन कार्यक्रम व्हिडिओ पाहण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा.*


*👉आनंदाची शाळा आमुची*



*👉 बम बम भोले मस्ती में डोले*

*👉आमच्या पप्पांनी गणपती आणला*





*👉 असावा सुंदर चॉकलेटचा बंगला*



*👉 अग्गोबाई ढग्गोबाई*



*👉रविवार माझ्या आवडीचा*





*👉 पापा मेरे पापा*




*👉आई मला खेळायला जायचंय*

*👉 आस्ते कदम*




















*


Thursday, April 11, 2024

बेलदारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश





विविध वर्तमानपत्रांनी घेतलेली दखल
 

पुण्यनगरी पेपरमधील आलेली बातमी



दैनिक ललकार पेपरमधील आलेली बातमी


केसरी पेपरमधील आलेली बातमी


तरुण भारत पेपरमधील आलेली बातमी


सकाळ पेपरमधील आलेली बातमी

Friday, January 26, 2024

बेलदारवाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*आज शुक्रवार दिनांक २६.०१.२०२४ रोजी ग्रामपंचायत बेलदारवाडी , जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी , अंगणवाडी क्रमांक ९९ बेलदारवाडी ता.शिराळा येथे ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत बेलदारवाडी व जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर यांच्या हस्ते करण्यात आले तर शाळेचे ध्वजारोहण रिटायर्ड ASI श्री.आनंदा शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हणण्यात आले.त्यानंतर विद्यार्थी घोषणा झाल्या. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली.यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले.यानंतर पहिलीतील रूद्रांश सुधीर बिळासकर , वेदांतिका विक्रमसिंह बिळासकर व साईराज चंद्रकांत शेवाळे यांनी व दुसरीमधील राजवी राजाराम काटवटे, रिद्धी संदिप मस्कर , कार्तिकी रमेश पाटील , आयुष अमोल महाडिक यांनी इंग्रजी संभाषण ( ENGLISH CONVERSATION ) सादर केले. तिसरी मधील देवराज अमोल शेटके व चौथीमधील जयराज जनार्दन शेवाळे यांनी English Verb सर्व उपस्थितांना म्हणून दाखविले.त्याबद्दल वरील सर्वांचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.त्यानंतर शिराळा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.यामध्ये श्वेता तानाजी शेवाळे हिचा १०० मी. धावणे - प्रथम क्रमांक व गोळाफेक मध्ये द्वितीय क्रमांक , रोहन बाळासो बिळासकर याचा ५० मी. धावणे मध्ये - प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.त्यानंतर शाळेतील मुलींचा खो-खो संघाचा शिराळा केंद्रात प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांचे ही प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.त्यामधील सहभागी विद्यार्थिनी खालील प्रमाणे*

*१.श्रुती चंद्रकांत शेवाळे*

*२.श्वेता तानाजी शेवाळे*

*३.शरयू दिनकर जाधव*

*४.अनुष्का चंद्रकांत शेवाळे*

*५.आरोही सुहास मस्कर*

*६.आरोही शंकर जाधव*

*७.रिद्धी संदिप मस्कर*

*८.कार्तिकी रमेश पाटील*

*९.राजवी राजाराम काटवटे*

*त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर यांच्या सौजन्याने श्री.सुधीर शशिकांत बिळासकर यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्याना स्पोर्ट्स गणवेशाचे वाटप करण्यात आले.त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने आभार.यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना गावातील ग्रामस्थांनी आणलेल्या खाऊचे ( बिस्कीट , चॉकलेट, जिलेबी ) विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.त्यानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर घोषणा दिल्या. प्रभातफेरी वेळी गावातील विविध ग्रामस्थांनी शाळेतील सर्व मुलांना खाऊ वाटप केला.त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने आभार*


*सदर कार्यक्रमासाठी उपसरपंच सौ.लक्ष्मी शेवाळे , ग्रामपंचायत सदस्य सौ.मनिषा तानाजी मदने , पोलीस पाटील श्री.योगेश मस्कर , सुधीर बिळासकर , विक्रमसिंह बिळासकर ,श्री.चंद्रकांत शेवाळे , श्री.बाळासो बिळासकर , शिक्षकवृंद , पालक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.*


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳