नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Monday, June 12, 2023

सांगली जिल्हा गुणवत्ता शोध परीक्षेत मानकरवाडी शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

मार्च २०२३ मध्ये झालेल्या सांगली जिल्हा गुणवत्ता शोध परीक्षेत मानकरवाडी शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.शाळेतील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले गुण खालीलप्रमाणे

1. श्रेया कुमार म्होप्रेकर - ९८ गुण 

    2.भाविक प्रितम भिलारे - ९० गुण 

3.पार्थ प्रताप भिलारे - ८८ गुण 

4.आर्ष अमोल भोसले याने ७८ गुण

  

          सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक राजाराम काटवटे सर , मुख्याध्यापक भरत पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.वाकुर्डे केंद्राचे केंद्रप्रमुख तानाजी माने , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार मानकर तसेच  विद्यार्थांचे  पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




Tuesday, June 6, 2023

शिवस्वराज्य दिन

आज मंगळवार दिनांक ०६.०६.२०२३ रोजी ग्रामपंचायत बेलदारवाडी,जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी व अंगणवाडी बेलदारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बेलदारवाडी येथे शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी बेलदारवाडी गावच्या सरपंच माननीय योगिता सुधीर बिळासकर व उपसरपंच लक्ष्मी बाबासो शेवाळे यांच्या हस्ते स्वराज्य गुढीचे पूजन करण्यात आले.त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत व राज्यगीत (महाराष्ट्र गीत) गायन करण्यात आले.सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या मनिषा तानाजी मदने,अंगणवाडी मदतनीस संगीता शेवाळे आशा स्वयंसेविका सुजाता शेवाळे शाळेचे मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर,उपशिक्षक श्री.राजाराम काटवटे सर आणि ग्रामपंचायत कर्मचारी विजय तटले व गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.शेवटी मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रमाची क्षणचित्रे खालीलप्रमाणे

Thursday, June 1, 2023

१० वी (S.S.C.) निकाल अपडेट

मार्च २०२३ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन लागलेला आहे.


खालील टॉप 3 वेबसाईटवर १० वीचा निकाल पाहायला मिळेल.

वेबसाईट क्रमांक १


वेबसाईट क्रमांक २


वेबसाईट क्रमांक ३





 

Wednesday, May 24, 2023

१२ वी ( HSC ) निकाल

 पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.                                  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरूवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. 

         अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. त्यावर क्लिक करून आपण निकाल पाहू शकाल.

१. mahresult.nic.in

२. https://hsc.mahresults.org.in

३. http://hscresult.mkcl.org

                        परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.

www.mahresult.nic.in 

                 या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच

 www.mahahsscboard.in 

या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Sunday, May 21, 2023

विविध कार्यक्रम व्हिडिओ


योगासने 

मनोरे

बालिका दिन

 

वाचन प्रेरणा दिन


आकाशकंदील व मातकाम


शिक्षण परिषद क्र.१०


७५ वा स्वातंत्र्यदिन


कागदकाम




Saturday, May 20, 2023

शाळा पूर्व तयारी मेळावा सन 2023-24

दिनांक 29.04.2023 रोजी जिल्हा परिषद शाळा मानकरवाडी येथे शाळा पूर्व तयारी मेळावा घेण्यात आला त्याचा व्हिडिओ खालीलप्रमाणे 


 

विविध क्षणचित्रे

सांगली जिल्हा गुणवत्ता परीक्षा - ३ री मध्ये यश



समृध्दी परीक्षा सन २०२२ - २३ मध्ये यश




पतंगराव कदम गुणवत्ता परीक्षेत घवघवीत यश
सन २०२१ - २२






* समृध्दी परीक्षा सन २०१९ - २० मध्ये यश *



* मूल्यवर्धन कार्यक्रमात CEO राऊत साहेबांच्या हस्ते सत्कार  *


* जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत यश *


* शैक्षणिक साहित्याचे परीक्षण करताना शिक्षणाधिकारी वाघमोडे मॅडम *






* तालुकास्तर शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल उपसभापती श्री.सम्राट नाईक यांच्या हस्ते सत्कार *


* तालुकास्तर शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी श्री.देशमुख साहेब यांच्या हस्ते सत्कार *


* तालुकास्तर शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी श्री.दळवी साहेब यांच्या हस्ते सत्कार *


* इंग्रजी भाषा समृद्धी कार्यक्रम तालुकास्तरावर यश *



* शैक्षणिक सहल सन २०१२ - २०१३ *