नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Wednesday, October 2, 2024

बेलदारवाडी येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी



 आज ग्रामपंचायत बेलदारवाडी व जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी बेलदारवाडी गावच्या सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर आणि उपसरपंच सौ.लक्ष्मी बाबासो शेवाळे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते महात्मा गांधीच्या फोटोचे प्रतिमापूजन करण्यात आले.त्यानंतर मुलांना महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा माहितीपर व्हिडिओ संगणकावर दाखवण्यात आला. त्यानंतर मुलांची भाषणे झाली. यामध्ये अनुष्का चंद्रकांत शेवाळे ,  सोहम शिवाजी मस्कर ,  देवराज अमोल शेटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर यांनी दोन्ही नेत्यांची माहिती सांगितली. यावेळी सरपंच सौ.योगिता बिळासकर, उपसरपंच सौ.लक्ष्मी शेवाळे , मुख्याध्यापक श्री.तानाजी कदम सर , उपशिक्षक श्री.राजाराम काटवटे सर , ग्रामपंचायत कर्मचारी विजय तटले उपस्थित होते.शेवटी श्री.राजाराम काटवटे सर यांनी आभार मानले.

महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना विद्यार्थी

महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना विद्यार्थिनी
सोहम शिवाजी मस्कर 
देवराज अमोल शेटके
सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर 
उपसरपंच सौ.लक्ष्मी बाबासो शेवाळे
राजाराम काटवटे सर
अनुष्का चंद्रकांत शेवाळे
मुख्याध्यापक तानाजी कदम सर