📙🌴📙🌳📙🌴📙🌳
📘🌲📘🌲📘🌲📘🌲
*आज जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी मधील विद्यार्थी व शिक्षक यांनी परिसर अभ्यास या विषयांतर्गत परिसर भेट दिली.या अंतर्गत शेततळे , छोटा तलाव , शेतातील पीके - सोयाबीन , स्टोन क्रशर यांना भेट दिली. शेततळे कसे तयार केले जाते याची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.तर बांध घालून पाणी कसे अडवले जाते ते ही पाहिले. त्यानंतर मुलांनी स्टोन क्रशर ला भेट दिली. स्टोन क्रशरचे काम नक्की कसे चालते डोंगर फोडून दगडाचे तुकडे जेसीबीच्या साहाय्याने गोळा केले जातात. दगड डंपरद्वारे डोंगरातून आणल्यानंतर त्याची खडी व वाळू / ग्रीड कशी तयार केली जाते , यासाठी कोणकोणत्या मशिनी लागतात त्यांची प्रत्यक्ष पाहणी मुलांनी केली.निसर्ग भेटीत निसर्गाचे निरीक्षण करताना निसर्गाचाच एक महत्वाचा घटक तो म्हणजे पाऊस.या पावसावर सर्व निसर्ग अवलंबून असतो त्याचे अस्तित्व दाखवण्यासाठी या परिसर भेटीत पावसानेही अचानक हजेरी लावली. त्यामुळे मुलेही थोडी भिजली.पाऊस सोडला तर ही परिसर भेट खूप छान अशी झाली मुलांना तिसरीमध्ये परिसर अभ्यास या विषयात पाणी नक्की येते कोठून हा पाठ आहे त्याची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.मुलांनी सर्वांचा मनमुरादपणे आनंद घेतला.त्याची क्षणचित्रे खालीलप्रमाणे*
🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️