नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Saturday, July 20, 2024

बेलदारवाडी येथे बालदिंडी सोहळा उत्साहात साजरा



ज्ञानोबा माऊली तुकाराम

ज्ञानोबा माऊली तुकाराम 


                या जयघोषात जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा मधील विद्यार्थ्यांचा बाल दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. बेलदारवाडी गावामधील शाळेपासून ही दिंडी सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या माऊलींच्या जयघोषाने परिसर दमदमून गेला.गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिर येथे आल्यानंतर विद्यार्थ्यांनी रिंगण घातले.मुलांनी फुगड्या घातल्या.या वेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.यानंतर हनुमानाचे दर्शन घेऊन मुलांची बालदिंडी परत निघाली.यावेळी शंकर जाधव आणि शिवाजी मस्कर यांनी छोट्या वारकऱ्यांना खाऊ वाटप केला.सदर दिंडीमध्ये उपसरपंच लक्ष्मी शेवाळे , ग्रामपंचायत सदस्या मनिषा मदने ,  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संदिप मस्कर , पालक अमोल शेटके , कुमार बोंगे , शिवाजी मस्कर संगीता शेवाळे , मुख्याध्यापक तानाजी कदम , शिक्षक राजाराम काटवटे, तसेच इतर पालक , ग्रामस्थ उपस्थित होते.


व्हिडिओ खाली क्लिक करून पाहू शकाल.




बेलदारवाडी शाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत



वैराग्यमूर्ती दिनांक 20.7.2024

सांगली जिल्हा गुणवत्ता शोध चाचणी परीक्षा सन २०२३-२४ मध्ये जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडीमधील शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले. पहिलीमधील रुद्रांश सुधीर बिळासकर याने ८८ गुण मिळवून सांगली जिल्ह्यात ७ वा क्रमांक मिळवला.तर दुसरीमधील राजवी राजाराम काटवटे हिनेदेखील ८८ गुण मिळवून सांगली जिल्ह्यात ७ वा क्रमांक मिळविला. यांच्याबरोबर पहिलीमधील वेदांतिका विक्रमसिंह बिळासकर , शौर्य बाळासो बिळासकर , साईराज चंद्रकांत शेवाळे , स्वरा रमेश पाटील यांनी तर दुसरीमधील रिद्धी संदिप मस्कर या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले.सदर विदयार्थ्यांना वर्गशिक्षक श्री.राजाराम प्रकाश काटवटे सर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे बेलदारवाडी गावच्या सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संदिप विश्वास मस्कर , उपाध्यक्ष श्री.शंकर किसन जाधव , मुख्याध्यापक तानाजी कदम , तसेच सर्व पालकांनी अभिनंदन केले.


दैनिक वाळवा क्रांती दिनांक 20.7.2024



सकाळ दिनांक 21.7.2024