नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.या ब्लॉगमध्ये आपणांस विविध PDF,व्हिडिओ,अभ्यास,टेस्ट पाहायला मिळेल.हा ब्लॉग आपणांस आवडल्यास नक्की शेअर आणि Follow करा. मोबाईल क्रमांक : 9890943956

माझी मराठी शाळा ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

Friday, January 26, 2024

बेलदारवाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*आज शुक्रवार दिनांक २६.०१.२०२४ रोजी ग्रामपंचायत बेलदारवाडी , जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी , अंगणवाडी क्रमांक ९९ बेलदारवाडी ता.शिराळा येथे ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत बेलदारवाडी व जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर यांच्या हस्ते करण्यात आले तर शाळेचे ध्वजारोहण रिटायर्ड ASI श्री.आनंदा शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हणण्यात आले.त्यानंतर विद्यार्थी घोषणा झाल्या. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली.यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले.यानंतर पहिलीतील रूद्रांश सुधीर बिळासकर , वेदांतिका विक्रमसिंह बिळासकर व साईराज चंद्रकांत शेवाळे यांनी व दुसरीमधील राजवी राजाराम काटवटे, रिद्धी संदिप मस्कर , कार्तिकी रमेश पाटील , आयुष अमोल महाडिक यांनी इंग्रजी संभाषण ( ENGLISH CONVERSATION ) सादर केले. तिसरी मधील देवराज अमोल शेटके व चौथीमधील जयराज जनार्दन शेवाळे यांनी English Verb सर्व उपस्थितांना म्हणून दाखविले.त्याबद्दल वरील सर्वांचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.त्यानंतर शिराळा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.यामध्ये श्वेता तानाजी शेवाळे हिचा १०० मी. धावणे - प्रथम क्रमांक व गोळाफेक मध्ये द्वितीय क्रमांक , रोहन बाळासो बिळासकर याचा ५० मी. धावणे मध्ये - प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.त्यानंतर शाळेतील मुलींचा खो-खो संघाचा शिराळा केंद्रात प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांचे ही प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.त्यामधील सहभागी विद्यार्थिनी खालील प्रमाणे*

*१.श्रुती चंद्रकांत शेवाळे*

*२.श्वेता तानाजी शेवाळे*

*३.शरयू दिनकर जाधव*

*४.अनुष्का चंद्रकांत शेवाळे*

*५.आरोही सुहास मस्कर*

*६.आरोही शंकर जाधव*

*७.रिद्धी संदिप मस्कर*

*८.कार्तिकी रमेश पाटील*

*९.राजवी राजाराम काटवटे*

*त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लोकनियुक्त सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर यांच्या सौजन्याने श्री.सुधीर शशिकांत बिळासकर यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्याना स्पोर्ट्स गणवेशाचे वाटप करण्यात आले.त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने आभार.यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना गावातील ग्रामस्थांनी आणलेल्या खाऊचे ( बिस्कीट , चॉकलेट, जिलेबी ) विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.त्यानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर घोषणा दिल्या. प्रभातफेरी वेळी गावातील विविध ग्रामस्थांनी शाळेतील सर्व मुलांना खाऊ वाटप केला.त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने आभार*


*सदर कार्यक्रमासाठी उपसरपंच सौ.लक्ष्मी शेवाळे , ग्रामपंचायत सदस्य सौ.मनिषा तानाजी मदने , पोलीस पाटील श्री.योगेश मस्कर , सुधीर बिळासकर , विक्रमसिंह बिळासकर ,श्री.चंद्रकांत शेवाळे , श्री.बाळासो बिळासकर , शिक्षकवृंद , पालक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.*


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

















Friday, January 19, 2024

वनभोजन जि.प.शाळा बेलदारवाडी

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
आज जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडीचे वनभोजन म्हसोबा मंदिर रेठरे धरण येथे आयोजित केले होते.सदर वनभोजनासाठी शाळेतील सर्व मुले उपस्थित होती.तसेच सदर वनभोजनासाठी बेलदारवाडी गावच्या सरपंच सौ योगिता सुधीर बिळासकर , ग्रामपंचायत सदस्या सौ.मनिषा तानाजी मदने , SMC उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत शेवाळे तसेच श्री.विक्रमसिंह बिळासकर , श्री.तानाजी मदने उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार.सदर वनभोजनासाठी श्री.विक्रमसिंह बिळासकर यांनी पावटे वगैरे किरकोळ खर्चासाठी शाळेस ५०० रुपयांची मदत केली तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्याना स्वतःच्या चार चाकी गाडीतून सोडले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.सदर वनभोजनाचा स्वयंपाक करण्यासाठी अंगणवाडी सेविका सौ. विजया पाटील मॅडम , संगीता शेवाळे मॅडम तसेच आशा स्वयंसेविका सौ.सुजाता शेवाळे मॅडम , स्वयंपाकी रुक्मिणी तटले यांचे अनमोल असे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचेही शाळेच्या वतीने आभार. सदर कार्यक्रमासाठी तानाजी कदम सर ,  श्री. काटवटे सर , बिळासकर गुरुजी व इतर नागरिक उपस्थित होते.त्याची क्षणचित्रे खालील प्रमाणे.
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️